
बरोबर १०० वर्षांपूर्वी पंचविशीतील सावरकर स्वातंत्र्यप्राप्तीच्या ऐतिहासिक कार्यात लंडनमध्येच गढून गेले होते. ब्रिटिशांनी काढून घेतलेले शस्त्र मिळवून ते त्यांनी भारतीय तरुणांच्या हातात दिले, जे तरुण स्वतंत्र भारताची उत्तम प्रकारे सेवा करू शकतील त्यांना हुडकून भारतनिष्ठ आणि सक्षम बनवण्याचे काम त्यांनी केले आणि संधी मिळताच ब्रिटनविरुद्ध युद्ध छेडण्याच्या दृष्टीने सशस्त्र क्रांतीकारकांचे आंतरराष्ट्रीय संधान त्यांनी बांधले. हे त्यांनी कसे साधले याचा अभ्यास केला, तर आजच्या युवकांना निराशा शिवणारदेखील नाही. संक्षेपाने सांगायचे तर सावरकरांनी मराठी तरुणांना नित्य म्हणावयाच्या आपल्या स्नानमंत्रातील पाकिस्तानात ढकलण्यात आलेली सिंधू नदी मुक्त करण्याचे ध्येय दिले आहे. ते ध्येय व्यवहारात उतरवणे शक्य व्हावे म्हणून त्यांनी सैन्यात शिरण्याचा कार्यक्रम दिला आहे. आपल्या सेनादलात अधिकार्यांची १२,००० पदे रिक्त आहेत. तरुणांना आपण सैनिक व्हावे, असे वाटत नाही; म्हणून ही पदे भरली गेली नाहीत. `महाराष्ट्र भारताचा खड्गहस्त' असे सावरकर म्हणाले होते. त्याला जागून मराठी तरुण सैन्यात शिरले, तर महाराष्ट्राचेच काय अवघ्या भारताचे नवनिर्माण ते करू शकतील !
1 comment:
हे सिंधुसरिते ! आम्ही तुला कधीही विसरू शकणार नाही.
सिंधुवाचून हिंदु म्हणजे प्राणांवाचून कुडी व शब्दांवाचून अर्थ.
Post a Comment