आहेत आणि त्यांचा वध हे अपरिहार्य कर्तव्य आहे याची मला खात्री पटली.
३० जानेवारी १९४८ संध्याकाळी ५ च्या पुर्वी १० एक मिनीटे असताना मी बिर्ला भवनाच्या दाराशी गेलो. दारावरील पहारेकरी प्रार्थनेला जाणार्यांचे निरीक्षण करत होते. त्यांचं मला सर्वात अधिक भय होतं, म्हणुन चार पाच लोक जात होते, त्यांच्यातलाच मी एक आहे असं समजलं जावं ही दक्षता घेऊन आत गेलो. ५ वाजल्यावर १० एक मिनीटे होऊन गेली होती. गांधी आणि त्यांच्या जवळचे लोक खोलीच्या आतल्या परिसरातुन प्रार्थना स्थळाकडे निघु लागल्याच मला दिसलं. ते जिथुन अंगणाच्या पायर्या चढतील त्या ठिकाणच्या आसपास लोकांच्या आवरणात मी उभा राहीलो. गांधी पायर्या चढुन ५-६ पावलं पुढे आले, गांधींच्या भोवताली लोक असले तरी मला हवी असलेली मोकळीक मला मिळतेय एवढं मी बघितलं होतं. मला आणखी ३ सेकंदाचा वेळ हवा होता. दोन पावलं पुढे सरकुन गांधींच्या पुढ्यात जाणं, शस्त्र बाहेर काढणं आणि गांधींनी आपल्या जीवनात जी म्हणुन उपयुक्त देशसेवा केली, त्याग केला त्यासाठी त्यांना वंदन करणं. त्या दोन मुलीतली एक गांधींच्या जवळ होती. तिला दुखापत होईल अशी मला भीती होती. त्यावरील उपाय मनात योजुन मी पुढे सरलो. गांधींना नमस्ते या शब्दात वंदन केलं, एक पाऊल पुढे सरलो आणि............. आधीच क्लेश असलेले गांधी "अह्" असा अस्पष्ट आवाज करतं अचेतन होऊन खाली पडले.
वध झाला आणि मला अटकही करण्यात आली. पोलीस अधिकार्यांनी मला रात्रभर जागवल नाही पण ते कदाचित रात्रभर जागले असतील. खरं तर मला त्यांना एकट जागतं ठेवणं तस जीवावर आलं होतं पण मग मी विचार केला, मी दुपारी जागा होतो, पिस्तुल स्वच्छ करत होतो, त्यात गोळ्या भरत होतो. त्यावेळी त्यांनी वामपुक्षी घेतली असेल कदाचित, मग आता ते थोडे जागले तर काय बिघडलं. शांत झोप लागली मला त्या रात्री, अखंड हिंदुस्तानात आम्ही दोघच त्या रात्री शांतपणे झोपलो असु. कोठडीत झोपलेला मी आणि शितगृहात चिरनिद्रा घेणारे गांधी. बाकी सर्व देश धगधगत होता. काहींची कत्तल होत होती तर काही कत्तल करत होते. मातेच्या उदरातील गर्भही त्यारात्री शांतपणे पोहुरले नसतील. माझ्या आई - वडिलांना स.बु. बर्वेंनी आदल्यारात्रीच फरासखान्यावर नेवुन ठेवले, त्यामुळे ते वाचले. पण माझ्या भावाला दत्तात्रयला मात्र मारहाण झाली दुसर्या दिवशी तर सकाळ पासुन तर अटकसत्राला सुरुवातच झाली. विष्णु करकरे, डॉ. परचुरे, शंकर किस्तय्या, मदनलाल, नाना आपटे आणि तात्याराव सावरकर, एकेक करत सगळे मंडळी जमा होऊ लागले. तात्यारावांना तर याखटल्यात उगाचच गोवण्यात आल होतं. पण खरं सांगु का? तात्यारावांना अटक झाली याचा मला एक वेगळाच फायदा मिळाला. तो म्हणजे त्यांचा मिळालेला उदंड सहवास, तात्याराव निर्दोष होते त्यामुळे ते निर्दोष मुक्त
होणार ही सर्वांनाच खात्री होती. पण बाहेर असे तात्याराव एकटे कधीच भेटत नसतं. त्यांच्याबरोबर असणारी लोकांची वर्दळ त्यांच लिखाण, सभा. पण इथे तात्याराव फक्त आमचेच होते. खुप शिकायला मिळालं त्यांच्या सहवासात, आयुष्याचे शेवटचे दिवस अगदी चांगले गेले, सत्कारणी लागले. मृत्युंजयच तो मृत्युची सावली सुद्धा त्यांच्यापासुन अंग चोरुन उभी होती. एकदा आम्ही असेच सर्वे गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात एक सिनीयर जेलर राऊंडसाठी आला, आम्हा सगळ्यांकडे एक एक पुठ्याच कार्ड दिलेलं असायचं त्याच्यावर कैद्याच नाव आणि त्याच्यावर लागलेली कलम असायची त्या जेलरला पाहताक्षणी तात्याराव उठले त्यांनी आपल्या पुठ्याच कार्ड छातीशी धरलं जेलर ओशाळला म्हणाला, ' सावरकरजी ये क्या कर रहे है ' तात्याराव म्हणाले, ' क्या कर रहां हुं? यही तो जेल का कानुन है वही तो मै कर रहां हुं.' जेलर म्हणाला, 'मगर बाकी लोक भी तो है, वे तो खडे नही रहें.' तात्याराव म्हणाले, ' वह तो बच्चे है. मै दुबारा हुं.' तुरुंगात दुसर्यांदा येणार्या कैद्याला दुबारा म्हणतात. तात्याराव खरचं दुबारा होते, स्वातंत्र्यापुर्वीही त्यांनी कारावास भोगला परकीय सरकारशी लढले म्हणुन आणि स्वातंत्र्यानंतर स्वकीय सरकारने त्यांना कारावासच भोगायला लावला. आम्हाला लाल किल्यात ठेवलं होतं. विषेश न्यायालय तिथेच भरायचं न्यायालय नसेल त्यादिवशी मोकळा दिवस असायचा. गप्पा तर अशा रंगायच्या की कोणाला वाटेल सहलीसाठी मित्रमंडळी जमली आहेत की काय. शिक्षेच सावट आम्ही सर्वांनीच मान्य केललं असल्यामुळे ते कोणालाच जाणवलं नाही, ती आम्हाला सावलीच वाटायची आणि मृत्युदंड हा तर मुक्ततेचा मार्गच. फासाचा दोर मला जाणवत होता तो पोलीस अधिकारी, जेल कर्मचारी आणि न्यायमुर्तींच्या चेहर्यावर. त्यांच्या चेहर्यावरच्या सुरुकुत्या सुंभाने विणल्या आहेत की काय असे वाटतं होतं. पोलीस सुप्रिटंडट शेख चिडचीडल्यासारखे वागत होते. अर्थात ही चीडचीड माझ्यावर नव्हती, स्वतःवरच होती. तिरडी बांधणार्यामाणसाची तत्परता त्यांच्या हालचालीमध्ये मला जाणवत होती. तिरडी बांधायला तर हवी पण आपल्या माणसाला आपण आपल्या हाताने शेवटच्या प्रवासाला घेऊन जायचे त्याला अग्नी द्यायचा, या कल्पनेने डोळ्यात अश्रु आल्याशिवाय राहत नाही. अजुनपर्यंत मजबुतपणे तिरडी वाहुन नेणारे खांदे मी तरी पाहीले नाहीत. मृत्यु माणसानाच नाही तर पशुंनाही जाणवायला लागला होता. आम्ही एक मांजराच पिल्लु पाळलं होतं लाल किल्यावर, मोठ मजेत होतं. दिवसभर खेळायचं उन्हात आणि सगळ्यांकडुन दुध वसुल करायचं. कधी माझ्या पांघरुणात येऊन शिरायचं तर कधी नानाच्या कधी तात्यारावांच्या डोक्यावर जाऊन बसायचं. तात्याराव एकदा गमतीने म्हणाले सुद्धा गेल्याजन्मी गोरा साहेब असला पाहीजे. गेल्या जन्मीची हौस या जन्मी भागवुन घेतो. न्यायमुर्ती निकालपत्र वाचणार होते त्याच्या आधीची रात्र, ते पिलू माझ्या अंथरुणाजवळ झोपलं होतं मध्यरात्री अचानक ते ताडकन् उठुन जाग झालं आणि कोठडीतुन पसार झालं. माझ्याबरोबर सावली सारखा चालणारा मृत्यु त्याला जाणवला असेल कदाचित. मला मात्र मृत्यु कधीच टोचला नाही बोचला नाही. जाणीवेच्या गाभार्यात कधीच तो सलला नाही. मी कस्तुरी सारखा पचवला असेल बहुदा. त्याचा सुगंध मला कधी जाणवलाच नाही. पण आमच्यात एकटा पडला तो दिगंबर बडगे. तो माफीचा साक्षीदार होता. बडगेचा मला कधीच राग आला नाही. त्याचा विचार मनात आला की फक्त कीव यायची. एखादी गोष्ट सत्सद विवेकबुद्धीने मनात स्मरुन केली तर मग परिणामांना कसं सामोर जायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. परिणामांचा विचार केला नाही तर कातडी गमावते पण आतला माणुस एकसंध राहतो तो दुभंगत नाही यालाच सदेह वैकुंठाला जाणे असे म्हणतात. बडगेने पहिला मार्ग स्वीकारला त्यामुळे तो एकाकी पडला. माझी आणि बडगेची फक्त एकदा आणि एकदाच भेट झाली. वरवर ती भेट अपघाती वाटत असली तरी नीट विचार केला तर वाटतं की घटीत होती. इंस्पेक्टर सावंतांनीच ती घडवुन आणली होती. इंस्पेक्टर सावंत हा एक वेगळाच माणुस होता तो जर न्यायासनावर बसला असता तर त्याने आम्हा सगळ्यांनाच मुक्त केलं असतं. बडगेला त्यादिवशी कोर्टात माफीचा साक्षीदार म्हणुन हजर करणार होते, तेव्हा इंस्पेक्टर सावंतांनी बडगेची आणि माझी भेट घडवुन आणली. सांवंतही तिथेच होते कारण सत्याला साक्षीदाराची अडचण येत नसते. बडगेला पश्चाताप झाला होता मी म्हणालो त्याला की पश्चातापाला काही अर्थ नसतो कारण क्रिया आधीच घडुन गेलेली असते. तु चुकला असशील असे तुला वाटत असेल तर तो समज मनातुन काढुन टाक. जगण्यासाठी प्रयत्न करणं जीव वाचवण्यासाठी धडपडण हा गुन्हा नाही. तो धर्म आहे, नव्हे ते प्रथम कर्तव्यच आहे. पण आपला जीव वाचवत असताना आपण इतर कुणाचा जीव अनाठायी घेत नाही ना, याची जाण ठेवावी. तु हिंदु आहेस हे जर तु नाकारलं असतं तर मला तुझी शरम वाटली असती. पण तुझ्या निवेदनाने माझ्या फासाचा दोर भक्कम झाला तरी मला तुझा राग येणार नाही. कारण मी मरणाला सिद्ध आहे. एकास एक हा सृष्टी नियमच आहे गांधी मेले नथुराम मेलाच पाहीजे. फक्त आपले निवेदन सत्य असेल याची काळजी घ्या. आपला जीव वाचवण्यासाठी सुद्धा खोटं निवेदन देऊ नकोस. तात्याराव निर्दोष आहेत. त्यांना अडकवण्याचा खोटा प्रयत्न जर तुझ्या मुखातुन होत असेल तर तुला वरच्या दरबारातही क्षमा नाही. अरे तात्याराव हीरा आहे. आपण फक्त कोंदण, कोंदणाने हीर्याचा आकार घ्यायचा असतो हीरा झाकवायचा वेडा प्रयत्नदेखील करायचा नसतो. एवढे सांगुन त्याला तेथुन जाण्यास सांगितले. बडगे आणि माझ्यामध्ये भेट घडवुन दिल्यामुळे इंस्पेक्टर सावंतांचे आभारच ते. सुर्याची काळजी करणारे आपण कोण? सुर्याला ग्रहण लागत अस आपल्याला वाटत, तोही आपल्याचा दृष्टीचा दोष असतो, बघण्याची आपली जागा चुकलेली असते. उद्या माणुस चंद्रावर उतरला तर त्याला
जाणवेल, सुर्याला कधीच ग्रहण लागत नाही.
खटला संपला! मला आणि नानाला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. हा खटला मी स्वतःच चालवला असल्याने वधामागची भुमिका स्पष्ट करु शकलो. आम्हा दोघांना लाल किल्याहुन आता अंबाला येथे नेणार होते कारण फाशीची सोय तिथेच होती. माझी इच्छा होती की येरवड्याला न्यायची, आई - वडिलांचं शेवटच दर्शन घेता आलं असतं. तसा अर्ज करण्याची सुचनाही मला सावंतांनी केली होती. पण आता कुठलीही इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार मला कसा असणार, मला आठवत होत की जेव्हा मला लाल किल्ल्यात आणल गेल तेव्हा सही करुन माझा चार्ज बॉडी रिसीट म्हणुन घेतला होता . नथुराम गोडसेचा शासकीय कागदपत्रात एकदा बॉडी म्हणुन उल्लेख झाला तेव्हा पासुन माझ्यातला मी उरलोच कुठे होतो. उद्या अंबाल्याच्या पोलीस पार्टीला नथुरामचा चार्ज नव्हे तर बॉडीचा चार्ज देणार आणि तेही बॉडीचाच चार्ज घेणार, आता या बॉडीची डेडबॉडी होणं ही फक्त एक औपचारिकता. आई - वडिलांची भेट व्हावी कारन त्यांना मला शेवटच भेटता याव म्हणुन, दिल्लीला येतानाच त्यांच शेवटच दर्शन झालं, असो. अंबाल्याला जायचं होत म्हणजे पानीपत मधुन चला त्या निमित्ताने त्या पवित्र भुमीच दर्शन तरी झालं. नाहीतर एरवी कशाला जाण झाल असतं. माझा अलिप्तपणा पाहुन सुप्रिटंडट शेखना माझा रागही येत असे. पण खटला चालु असताना त्यांच्या बसण्याच्या जागेवर गुलाबाची फुलं कोण आणुन ठेवतो हा प्रश्न मला नेहमीच पडत असे मी शेखना नेहमीच विचारायचो आणि ते नेहमीच उत्तर द्यायला टाळाटाल करायचे. पण अंबाल्याला जाण्याच्या आधी शेखानी मला माझ्या प्रश्नाच उत्तर दिलं. ती गुलाबाची फुलं त्यांची मुलगी जास्मीन आणुन द्यायची. ती गर्भवती असुनही, माझ्यासाठी ती दररोज दर्ग्यात जाऊन मन्नत मागायची. तिला प्रत्यक्ष जाऊन धन्यवाद देणे तर शक्य नव्हते पण सुप्रिटंडट शेख याच्या मार्फत तिला मी निरोप पाठविला की जर तुला तुझ्या या भावावर इतक प्रेम असेल तर तुला होणार्या बाळाची काळजी घे तुला मुलगाच होईल त्याच्यावर माझे संस्कार कर. उद्या जेव्हा या देशाला नथुरामची गरज पडेल तेव्हा हवा असलेला नथुराम तु जन्माला घाल. सुप्रिटंडट शेखांचे डोळे पाणावले. मला म्हणाले, ' पिस्तुलाच्या गोळीचा चाप ओढण्यासाठी मला या वर्दीच चिलखत घालाव लागत पण तु कुठलच चिलखत नसताना चाप ओढलास.' मी त्यांना म्हणालो की मला इतका मोठा करु नका शेख साहेब मी इतका मोठा नाही आहे. माझ्यात मोठेपणा असलाच तर तो इतकाच की ज्या वेळी जे करण गरजेच होत ते मी केलं. परिणामांची कल्पना असताना, पण माझ्याही अंगावर चिलखत होतच. काश्मिरला माझ्या देशातील सैनिकांनी सांडलेल्या रक्ताच चिलखत, फाळणीच्या वेळी माझ्या हिंदु बांधवांच्या रक्ताच चिलखत, माता भगिनींच्या भ्रष्ट झालेल्या शीलाच चिलखत, सावरकरांच्या विचारांच संस्कारांच चिलखत. मी काहीच केलं नाही मी तर फक्त ऋण फेडलं. पण हा नथुराम मातृभुमीकरीता फक्त एकच जीव ओवाळु शकतो याची खंत आहे.' खोट नाही सांगत पण मृत्युची मलाही खंत वाटली, मी मृत्यंजय नाही आहे. फासाच्या दोरावर लटकण्यापुर्वी जेव्हा माझ्या चेहर्यावर काळा बुरखा चढवला तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रु आले या मातृभुमीच दर्शन परत घेता येणार नव्हते, या मातीचा सुगंध, सिंधु नदीचा स्पर्श मला कधीही घेता येणार नाही. या सगळ्यांच दुःख मलाही जाणवलं.
अंबाल्याला नाना आपटे आणि मी पोहचलो. माझी कोठडी फाशीखान्याच्या समोरच होती. फाशी होण्याआधी त्याची रंगीततालीम चालु होती. तुम्हाला वाटेल की अरे फाशीची सुद्धा रंगीततालीम चालते? हो चालते. माझ्या वजनाची बाहुली घेऊन त्याची रेग्युलर हेंगिंग प्रमाणे तालीम होत होती. पण बाहुली बनवताना काहीतरी घोळ झाला होता सगळे घामाघुम झाले होते बिचारे, हेंगिंग स्टाफचे लोक म्हणत की, काय म्हणे मानेला ' प्रॉपर चर्क ' भेटत नाही. मी त्यांना म्हणायचो बाहुलीच्या बदली मला उभे करा, हो पण ते त्यांच्या नियमात बसत नव्हते, असो. फासावर जाण्यापुर्वी हातात काही पकडता येईल का? असा प्रश्न इंस्पेक्टर सावंतांना केलाहोता पण त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यास टाळाटाळ केली होती. तसं आमच्याकडे अखंड हिंदुस्तानाचे मानचित्र, भगवा ध्वज आणि भगवतगीता एवढेच सामान होते. ते अखेरच्या श्वासापर्यंत आमच्या जवळ असावे अशी आमची इच्छा होती. येथील जेलरांनी आम्हा दोघांना फासावर जाताना त्या वस्तु बाळगण्याची परवानगी दिली.
फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी व्हायला ८ दिवस शिल्लक असताना गांधींचे सुपुत्र देवीदास गांधी मला भेटायला आले. तशी आधी आमची भेट झाली होती एका पत्रकार परिषदेत, ते हिंदुस्तान टाईम्सचे पत्रकार म्हणुन आले होते आणि मी अग्रणीचा संपादक म्हणुन. गांधी वधाच्या दिवशी मला अटक केली तेव्हाही ते मला भेटायला आले होते आणि त्यांना व त्यांच्या परिवाराला झालेल्या वैयक्तिक नुकसानाबद्दल मी त्यांचे सांत्वनही केले. या वधामागील भुमिका काय होती? हे मी तुम्हाला सांगीन असा शब्दही त्यांना दिला होता. तसं खाजगीत भेटणं नियमानुसार शक्य नव्हतं पण जेलर साहेबांनीच तशी सोय केली होती. मी देवदासना म्हणालो, आज कस काय येणं केलत दोन वर्षांनंतर वेळ मिळाला. थोडसं संकुचित मनाने ते मला म्हणाले काही कागदपत्रावर सही हवी आहे तुमची. ती कागदपत्र म्हणजे वकालतनामा त्यांना माझी केस स्वीकारायची होती. देवीदास यांच्या म्हणण्यानुसार मी कोर्टात केस लढवताना काही मुद्दे वगळले होते. त्यांना माझ्या फाशीला आव्हान द्यायचे होते पण मी त्यांना म्हणालो मी वध केला आहे त्यामुळे मला जगण्याचा अधिकार नाही. मी तुम्हाला माझे वकीलपत्र नाही देऊ इच्छित. त्याच कारण त्यांनी माझ्याकडे विचारल मी त्यांना म्हणालो, तुम्ही वकालतनामा पुढे केलात तेव्हाच मी समजलो पण तुम्ही दुखावु नये म्हणुन उत्तर द्यायचे टाळत होतो. गांधींना हिंसा मान्य नव्हती म्हणुन त्यांच्या मारेकर्यालाही देहदंड देऊ नये हाच युक्तिवाद आहे तुमचा पण तो कायद्यात बसत नाही वकिलाने कायदा समजवुन मगच वकालतनाम्यावर सही मागायची असते कायद्याच्या कक्षेत भावना व्यक्तिगत हेवेदावे नाहीत. केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठीच ते माझ्याकडे आले होते. पुढे मी त्यांना म्हणालो तुम्हाला वकिलपत्रच जर स्वीकारायच होत तर तुम्ही तात्याराव सावरकरांच का नाही स्वीकारलं? नाना आपटेंच का नाही स्वीकारलं? या निरपराध माणसांच्या बचावाला तुम्ही का नाही उभे राहीलात? तुम्ही बचावाला उभे राहताय तर नथुराम गोडसेच्या का तर एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करायचा हे आपल्या पित्याच तत्वज्ञान सिद्ध करण्याचा क्षीण प्रयत्न म्हणुन. हे ऐकुन देवीदासना कदाचित वाईटही वाटल असेल. एक व्यक्ति या कक्षेपलिकडे एक विचार म्हणुन गांधींचा विचार मी करु शकत होतो तसे देवीदास करु शकत नव्हते. तुम्ही काय विचार केलात? असा सवाल देवीदासजींनी मला विचारला. पण हा प्रश्न विचारायला त्यांनी दोन वर्षे विलंब लावला. तशी मागे मी त्यांना ग्वाही दिली होती. या वधामागचा उद्देश वैयक्तिक कधीच नव्हता उद्देश फक्त राजकीय आणि राजकीयच होता. पण त्यांना मात्र हे पटत नव्हतं आणि कुठेतरी हे पटवुन घेण्याचा प्रामाणीक प्रयत्न ते करत होते त्यासाठीच ते माझ्याकडे आले होते हे माझ्या लक्षात आलं. आणि त्यांनी प्रयत्न केला तो त्यादिवशीच कारण ८ दिवसानंतर नथुरामच्या बचावाचे सारे मार्ग बंद झाले ते शल्य त्यांना आयुष्यभर सलत राहणार होते. आज वेळ गेली तर पुन्हा वेळ येणार नाही. त्यांना मी बसायला सांगितले. आणि म्हणालो की देवीदासजी मी माझ मृत्युपत्र लिहलं आहे त्यात माझी पहिली अंतिम इच्छा काय लिहीली आहे सांगु? सिंधु नदी अखंड हिंदुस्तानात येईपर्यंत माझ्या अस्थी विसर्जित केल्या जाऊ नयेत, मगच त्या सिंधु नदीत विसर्जित कराव्यात. पिढ्यान पिढ्या हस्तांतरीत केल्या तरी चालतील पण त्या जतन कराव्यात. देवीदासजी आपल्या हिंदु धर्मात अस्थी दहाव्या दिवशी विसर्जित करतात तो पर्यंत त्या घराबाहेर बांधुन ठेवतात. अस्थींच विसर्जन होत नाही तोपर्यंत आत्म्याला मुक्ति मिळत नाही असा समज आहे. पण मी जाणुन बुजुन माझा आत्मा बंधनात ठेवणार आहे, त्याला मुक्त होऊ देणार नाही. कारण गांधी जसे तुमचे पिता आहेत तसे ते माझेही राष्ट्रपिता आहेत म्हणुन. गांधींनी शेवटची इच्छा प्रदर्शीत केली होती की त्यांची रक्षा सर्व नद्यांमध्ये विसर्जित केली जावी पण पाकिस्तानने त्यांची रक्षा सिंधु नदीत विसर्जित करायची परवानगी नाकरली जणु काही ते पाक पाणी त्यांच्या रक्षाच्या स्पर्शाने अमंगल होणार होते, तेव्हा मी एक खास पत्र पाठवुन भारत सरकारला विनंती केली होती गांधींच्या रक्षेचा काही अंश तरी जतन करा कारण या देशाचे शुर जवान केव्हा तरी सिंधु नदी हिंदुस्तानात खेचुन आणतीलच तेव्हा ती रक्षा सिंधु नदीत विसर्जित करा आणि हे कधीतरी होईलच कारण हा देशच भगिरथांचा आहे गंगा खेचुन आणणार्यांचा आहे. पण माझी विनंती मानली गेली नाही. गांधींचा तो तडफडणारा आत्मा एकाकी पडु नये म्हणुन दहाव्या दिवशी मी माझा आत्माही मुक्त होऊ देणार नाही. मरणांत आणि वैराणी असे सगळेच म्हणतात पण आयुष्यभर जी मुल्य पुजली त्यांना मृत्युनंतरही वंदन करणारा नथुराम एकच असतो. देवीदासजी तुमच्या पित्याशी माझं वैयक्तिक वैर काहीच नव्हतं पण त्याच भौतिक अस्तित्व संपवण्यात माझ्या देशाच भलं होतं. मी विद्वान नसेन देवीदासजी पण विद्वान माणसांच्या सहवासात मी आयुष्याची काही वर्षे काढली आहेत अगदी श्रीमंत नसलो तरी खाऊन पिऊन सुखी होतो. माझही स्वतःच एक स्थान होतं मान मरातम होता. गांधींचा वध करण्यापुर्वी त्यानंतर मी या सगळ्या गोष्टींना मुकणार आहे याची मला जाणीव होती पण मी मृत्यु स्विकारला भेकडासारखा पळुन नाही गेलो मला माझी भुमिका मांडायची होती. कारण माझ्याकडे माझी अशी भुमिका होती, विचार होता. गांधी हे महान होतेच जे सत्य आहे ते मी स्विकारण्याची